बालासाहेब जगतकर यांनी परळी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरावे ही सामान्य जनतेची इच्छा ! (बीड जिल्हा प्रतिनिधी) परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन म्हणजे केवळ प्रस्थापितासाठी सवता सुभा नव्हे तर लोकशाहीत सर्वांना मुभा असते. याचे भान प्रस्थापितांना राहिले नाही. राजकीय मक्तेदारी मोडीत काढावी लागेल गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत संधी हुकली ती आता हुकु द्यायची नाही. संधी दार ठोठावत असते हे सत्य असले तरी आज स्पर्धेच्या युगात तर दार तोडून संधी मिळवावी लागते. प्रसंगी घुसखोरावर मात करून गरुड भरारी घ्यावी लागते. परळी नगरपालिकेचा पल्ला गाठण्यासाठी बालासाहेब जगतकर यांची पुरेपूर तयारी झाली आहे. हट्ट करणं वाईट असतं पण कांही वेळी कांही हट्ट गुणकारी ठरतात. राजकीय दिशा ओळखून दूर दृष्टीने निर्णय घेऊन सकारात्मक पाऊल उचलण्याच्या निष्ठांतपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. लोकांना गृहीत धरून एकाधिकारशाहीच राजकारण करणाऱ्यांना शह देत लोकांच्या मनातले प्रश्न ओळखुन लोक भावना हाताळून निर्णय घेत लक्ष गाठण्यासाठी वाटचाल चालू आहे. निस्वार्थ भावनेतून कर्तव्य निभावत जन प्रेम उभा केल आहे. जनसेवा आणि थेट संपर्क ही अत्यंत साधी रणनिती ठेवून कायम जनतेची नाळ जोडली आहे.समस्या निर्मूलनासाठी यश अपयशाची परवा न करता लोकशाही मार्गाने संघर्ष चालू आहे. समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून केलेली सेवा वेळोवेळी साधलेला संवाद व संपर्क यामुळे निर्माण झालेली लोकशक्ती प्रचलित प्रस्थापितांना गारद करण्यासाठी भीमनगर सज्ज आहे. राजकीय मक्तेदारी व दहशतीखाली दबलेला काही मतदार वर्ग खुल्या मनाने बोलत नसला तरी निवडणुकीच्या रंणधूमाळीत भय मुक्तीसाठी बालासाहेब जगतकर यांना बिनधास्त मतदान करेल. आज. घडीची राजकीय परिस्थिती लक्षात घेता बालासाहेब जगतकर यांच्या जिद्दीला भीमनगरवासीय यांची साथ निश्चित लाभू शकते. लोकशाहीच्या बळावरच गरुड भरारी घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. वार्ड क्रमांक तीन भिम नगर मधील विकास कामे हे फक्त कागदावरच झालेले दिसतात. तर दलित वस्ती सुधार योजना असेल. किंवा अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना असेल.यांचा सर्व निधी दुसऱ्या वार्डात वापरल्या जात आहे. तो रोखण्यासाठी व भीमनगर येथील रस्ते,पाणी ,लाईट ,स्वच्छता.यासारख्या दैनंदिन मूलभूत सुविधा देण्यास प्रस्थापित अपयशी ठरले आहेत. जनतेने सदभावनेणे संधी दिली. परंतु मतदारांच्या विश्वासाला तडा गेला. टक्केवारीचा ठोका आणि विश्वास घाताचा झोका भीमनगर वाशीय यांच्या नशिबी आला. सामान्य जनतेची बांधिलकी न ठेवता त्यांना ग्रहित धरून राजकीय तमाशा चालू आहे. राजकीय हेराफेरीत जनतेला रस नाही.छातीवर दगड ठेवून मतदान केलं खरं पण काही विकास झालाच नाही किंवा विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याची इच्छाच दिसली नाही. दलित वस्तीतील स्मशानभूमी असेल, महिलांचे सार्वजनिक स्वच्छालय, असेल ,हायमस्ट दिवे असतील ,रोड, नाल्या असतील एकदम निकृष्ट दर्जाची कांही कामे आहेत तर 90 टक्के कामे ही कागदावरच आहेत ना जनता खुश ना कार्यकर्ते खुश अखेर भिम नगरच्या पदरात निराशाच आली .विकासाची सुबता सौहार्दता वातावरण निर्माण करून राजकीय व सार्वजनिक परिघात शांतिप्रिय लोकहिताचे राजकारण करण्यासाठी जनतेने आपल्या मनात आश्वासक विश्वासू चेहरा म्हणून बालासाहेब जगतकर यांची छबी प्रभावीपणे ठरणार आहे . कोरोना काळात गरजवंतांना गाजावाजां न करता धान्य पुरवून मदतीचा हात देणारा ,आणि कर्जात अडकू नये म्हणून बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गरीब मुलामुलीचे लग्न लावणारा, गरजूवंतांना घरकुल मिळवून देणारा ,सामाजिक ,धार्मिक, व शैक्षणिक कार्यक्रम घेऊन प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणारा म्हणून समाजसेवेची शिदोरी परळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामी येणार. नेतृत्व म्हणजे केवळ प्रेरणा देण्याची क्षमता नव्हे तर दृष्टीचे वास्तवात रूपांतर करण्याची क्षमता होय .ज्याच्या कृती आणि विचारातून स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळते, संघर्षातून नेता निर्माण करण्याची किमया त्यांच्या अंगी आहे .नगरसेवक पदाचे स्वप्न साकारण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या ऊर्जावाण नेतृत्वातून बळ मिळणारच आहे बालासाहेब जगतकर यांच्या व्यक्तिमत्वातील गुणवत्ता ,आणि क्षमता लक्षात घेऊन देशात नामांकित व राज्यात मोठा पक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद या तिन्ही पदाची त्यांना संधी मिळाली, कोरोना महामारीत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना सहकार्य केले .बीड येथील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी भीम नगर येथून सोळा गाड्या सह ढोल ताशाच्या गजरात सभा स्थळी पोहोचल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व मराठवाडा अध्यक्ष माननीय अशोक हिंगे पाटील यांनी रात्री बारा वाजता फोन करून कौतुक केले, नगरपालिकेच्या परिवर्तनासाठी मतदारांना झुंजार कामदार उमेदवार पाहिजे. बालासाहेब जगतकर यांनी केवळ पक्षाच्या पदाच्या व पत्रकारितेच्या माध्यमातून नगरसेवकाच्या तोडीचे कामे करून जनतेला विश्वास दिला आहे.कोणताही भेदाभेद न करता सर्व स्तरातील व नागरिकांपर्यंत सेवाकार्य पोहोचवलं. नवी कोरी पाटी, बंदा रुपया, आणि खणखणीत नाणं म्हणून बालासाहेब जगतकर यांनी भीमनगरच नेतृत्व कराव ही जनसामान्याची इच्छा. सामान्यजणाच्या पसंतीचा चेहरा जनतेनी हेरला आहे ,भीम नगरच्या इच्छापूर्तीसाठी भीमनगर वासीय निश्चितपणे विचार करत आहेत. जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर उद्याचे यश अवघड नाही ,पुढील वाटचालीस वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.,......... शुभेच्छुक:- संघपाल सुदामराव वैद्य. भीम नगर परळी वैजनाथ. मो. नं. ९८२२८२२००२
byMEDIA POLICE TIME
-
0