*प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत होणार, राज्य सरकार शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगणारा पुतळा उभारणार* ( मुंबई:प्रतिनिधी) शिवकालीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अफजलखानाच्या वधाच्या (afzal khan vadh) प्रसंगाची आणि छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याची महती सांगण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायथ्याशी एक पुतळा उभारला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी धिप्पाड अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्याच प्रसंगाची आठवण करुन देणारा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारला जाणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुतळा बसवण्याची घोषणा केली येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला हा पुतळा 18 फुटांचा आहे. हा पुतळा सध्या पुण्यात आहे. शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातलं, तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
byMEDIA POLICE TIME
-
0