*खिर्डी येथील पत्रकारांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान.*योगराज फाउंडेशन मु.नगर आयोजित (!खिर्डी ता. रावेर-)रावेर तालुक्यातील खिर्डी येथील दैनिक तरूण भारत चे पत्रकार सादिक पिंजारी(मंत्री) व पुण्य प्रताप चे विनायक जहूरे तसेच पुण्य नगरीचे प्रदिप महाराज व लोकमत चे संकेत पाटील व देशोन्नती चे शेख इद्रीस व साईमत चे कांतीलाल गाढे यांचा उत्कृष्ठ पत्रकार म्हणून योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर यांचे तर्फे सावदा येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभात सिने अभिनेता भारत गणेशपुरे व सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, व शाल पुष्प देऊन गौरवण्यात आले.सावदा ता.रावेर येथे दि. १४ जुलै रविवार रोजी योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर चे संयोजक विनोद सोनवणे यांनी घेतलेल्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या व उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभात सिने अभिनेता भारत गणेशपुरे व सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते उत्कृष्ठ पत्रकार म्हणून दैनिक तरूण भारत चे पत्रकार सादिक पिंजारी(मंत्री) व पुण्य प्रताप चे विनायक जहूरे तसेच पुण्य नगरीचे प्रदिप महाराज व लोकमत चे संकेत पाटील व देशोन्नती चे शेख इद्रीस व साईमत चे कांतीलाल गाढे यांना सन्मान चिन्ह, व शाल पुष्प देऊन संयोजक विनोद सोनवणे, प्रमोद सोनवणे, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, मानेकर बाबा यासह मान्यवरांच्या उपस्थित गौरव करण्यात आला.

Previous Post Next Post