मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी माळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)माळ गावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या योजनेच्या लाभांविषयी आणि फार्म भरण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आशाताई,अंगणवाडी सेविका, यांनी ग्रामपंचायत स्वरावरून लाडकी बहीण योजनेचा फार्म भरण्याचे नियोजन केले गुलगुलान फाउंडेशनचे सह संस्थापक राकेश पावरा यांनी योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले ग्रामसेवक ज्योती परडके यांनी योजनेचे फार्म भरून घेण्यासाठी नियोजन केले सरपंच सविता पावरा यांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म्सचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांना फार्म भरताना येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन केले या ग्रामसभेत उपसरपंच चिण्या पावरा, ग्रामपंचायत सदस्य सविता पावरा, सुमन पावरा, ज्योती पावरा, कुशाल पावरा, प्रकाश पावरा तसेच अंगणवाडी सेविका आशाताई आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना योजनेबद्दल उत्तम प्रतिसाद दिला. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार असल्याचे दर्शवले या विशेष ग्रामसभेमुळे लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीला चालना मिळाली असून गावातील मुलींनी महिलांना य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0