कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला बँकेतील कामकाजाचा अनुभव ! ... ( सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) तळोदा येथील गुलाबबाई दुल्लभ रासकुळे कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी आनंददायी शनिवार निमित्त देव मोगरा विद्या प्रसारक मंडळाचे मा. चेतनदादा पवार व प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या मार्गदर्शनातून दि हस्ती को ऑपरेटिव्ह बँक. लि. दोडाईचा शाखा तळोदा येथे बँकेतील दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनींनी घेतला पैसे काढणे, ठेवणे मुदत, ठेव खाती, चालू खाती व त्यावरील व्याज पैसे काढणे टाकणे यासाठी लागणाऱ्या स्लिप, धनादेश तसेच नोटा मोजणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक एटीएम कार्ड वापर, व खबरदारी या बद्दल तळोदा शाखेचे मॅनेजर किशोर चौधरी यांनी विस्तृत माहिती देत, बँकेकडून कन्या विद्यालयातील आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनीस एक बालपण भेट म्हणून देण्यात आला यावेळी योगेश सुशीर, अमित पावरा, लक्ष्मी कासार, पायल चव्हाण, नारसिंग वसावे,सुदिन लोहार आदी बँकेतील कर्मचाऱ्यासह ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र महाले, अनिल इंदीस, दिलीप तडवी, योगेश पाटील, आकाश महाजन, दिनेश मराठे, वैशाली देवरे, गौरी अग्निहोत्री, उल्हास मगरे, अनिल मगरे, हिराला पाडवी, सुधाकर माळी, यांनी धनराज केदार आदीसह विद्यार्थीनी मोठ्या संख्येने हजर होत्या यावेळी नरेंद्र महाले यांनी दि हस्ती बँक शाखा तळोदा येथील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0