माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली किनगाव बु.सरपंचपदी सौ.भारती पाटील यांची बिनविरोध निवड. यावल दि.२४ ( सुरेश पाटील विभागीय संपादक )माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.भारती प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आप आपसात ठरलेल्या प्रमाणे गेल्या महिन्यात किनगाव बु.ग्रामपंचायत सरपंच निर्मला संजय पाटील यांनी उशिरा का होईना राजीनामा दिला त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने आज बुधवार दि.२४ जुलै रोजी सभेचे अध्यासी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन त्यात सरपंचपदी सौ.भारती प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले.या बैठकीत सौ.निर्मला संजय पाटील,अलानुरूबी छबु तडवी,प्रमोद रामराव पाटील,सौ.सायरा लतीफ तडवी,किरण वसंत सोनवणे,लुकमान कलंदर तडवी,सौ.सावित्री रामकृष्ण धनगर,शेख मेहमूद शेख रुस्तम,सौ.स्नेहल मिलिंद चौधरी,विजय अरुण वारे,सौ.साधना राजेंद्र चौधरी,श्रीमती प्रमिलाबाई शामकांत पाटील आनंदा एकनाथ माळी,सौ.वंदना संजय वराडे,ग्रामविकास अधिकारी प्रदीप रतन धनगर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते सभागृहाबाहेर गावातील अनेक ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर नागरिक उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0