ललित परमार चार्टर्ड अकाउंटंटची (सीए) परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार. (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचा विद्यार्थी ललित ज्ञानेश्वर परमार हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट द्वारा आयोजित (सी.ए.) चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, प्राचार्य बी. के. सोनी, डॉ. एस. पी. पवार, डॉ. प्रकाश पटेल, प्रा. आर. एस. पाटील यांच्या हस्तेही त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. एम. गांगुर्डे व डॉ. जी. एस. गवई यांच्या सह त्याचे पालक उपस्थित होते. सीए ललित परमार याला वाणिज्य शाखेचे डॉ. जी. एस. गवई व डॉ. डी. एम. गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. ललित परमार हा अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर व वैशाली पटेल यांचा मुलगा असून त्याने सीएच्या परीक्षेमध्ये परिश्रम घेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, संस्थेच्या मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0