आठवडी बाजार येथील अंगणवाडीची दुराअवस्था. (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी यवतमाळ) जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील अंगणवाडी ची अत्यंत दुरअवस्था आहे. अंगणवाडी . गेली आठ दिवसापासून पाण्याची रिप रिप सुरू आहे . इमारतीच्या टीनाना जोडणारा टोपाचा पत्रा अत्यंत निकृष्ट असल्याने तो पूर्णतः सडला असून टीनपत्र्याना ही अनेक जागी छिद्रे पडली आहेत . त्या सडलेल्या टोपातील जागेतून आणि छिद्रातून पावसाचे पाणी गळत असल्याने अंगणवाडीत लहान मुलांना बसण्यासाठी जागा नाही .लहान लहान चिमुकले अक्षर गिरवण्यासाठी अंगणवाडीत येत आहेत. परंतु पावसामुळे सर्वत्र अंगणवाडीच्या इमारतीमध्ये लहान लहान मुलांना व अंगणवाडी सेविकांना सुद्धा बसने खूप अवघड झाले आहे. अंगणवाडी मध्ये 'अ' पासून ते 'ज्ञ ' पर्यंत म्हणजेच अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेण्याचा मार्ग होय. परंतु जागोजागी अंगणवाडीच्या इमारतीतून पाणी टपकत असल्यामुळे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जाण्यासाठी लहान चिमुकल्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे . लहान चिमुकल्यांच्या अंगावर पाणीटपकुन सर्दी, खोकला , ताप,या सारखे आजार होऊन नंतर त्याचे रूपांतर मोठ्या आजाराकडे सुद्धा होऊ शकते. त्यामुळे राजकीय, सामाजिक नेते ,कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक याकडे लक्ष देतील का? प्रशासनाची वाट न बघता. दानशूर लोकांनी एकत्रित येवून या इमारतीत गळणाऱ्या पाण्याचे नियोजन करून समस्या दूर करतील का ? आणि चिल्ल्या पील्याची बसण्याची व्यवस्था करतील का? असी अपेक्षा लहान, लहान चिमुकल्यांचे आई वडील करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0