आयटीआय लिमिटेड कडून जि.प.प्राथ.शाळा वडगाव आनंद शाळेच्या विद्यार्थ्यांना दोन संगणक संच भेट... (सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर) वडगाव आनंद (ता.जुन्नर ) जिल्हा परिषदांच्या शाळांना सुरक्षितेच्या दृष्टीने संरक्षण भिंत बांधकामे सध्या महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी चालू आहे . वाढते अतिक्रमण , हिंस्र प्राणी , मोकाट गुरे , शाळेच्या आवारातून जाणारे रस्ते यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या . या सर्वापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी समग्र शिक्षा , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई यांच्या अंतर्गत आयटीआय लिमिटेड कंपनीमार्फत संरक्षण भिंत बांधकाम करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या २१ शाळामध्ये या योजनेचे काम सुरु झाले आहे . त्यामध्ये सर्वाधिक शाळा जुन्नर तालुक्यातील आहे . त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शाळामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्यातील शाळांना संरक्षण भिंत बांधकाम करून मिळणार हे समजताच या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले . बांधकाम करण्यासाठी येणाऱ्या अडचणी समस्या सोडविण्याकरिता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे विशेष मार्गदर्शन तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, कार्यकारी अभियंता जितेंद्र मेमाणे, जुन्नर तालुका गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका शिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांचे विशेष सहकार्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक तसेच सर्व उप शिक्षक यांनी पुढाकार घेतला . जुन्नर तालुक्यातील अशाच एका शाळेने पुढाकार घेऊन बाकीच्या शाळेच्या संरक्षण भिंत बांधकाम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न डी.बी.वाळुंज यांनी केले. त्यामुळे आयटीआय लिमिटेड कंपनीमार्फत जि.प.प्राथ.शाळा, वडगाव आनंद शाळेच्या विद्यार्थ्यांना दोन संगणक संच भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले . दि.२६ जुलै रोजी कंपनी प्रतिनिधी विशाल कोकणे व शिवम सातपुते यांच्यामार्फत शाळांना संच सुपूर्त करण्यात आले. याकामी कंपनीचे अधिकारी कुणाल वामन व योगेश देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. संरक्षण भिंत बांधकाम पूर्ण झालेल्या भिंतीवर शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने संरक्षण विविध चित्रे , बोलक्या भिंती करनार आहे . त्यासाठी गावातील नागरिक तसेच विविध संस्था मदत करणार आहे. शालेय परिसर सुशोभीकरण करण्यासाठी संरक्षण भिंतिच्या बाजूने फुल झाडे लावण्यात येणार आहे. शाळेस संगणक संच मिळाल्यानंतर वडगाव आनंदच्या मुख्याध्यापक व डी.बी.नाना वाळुंज यांनी आयटीआय लिमिटेड कंपनीचे विशेष आभार व्यक्त केले आले . संगणक संच घेऊन आलेल्या कंपनी प्रतिनिधी विशाल कोकणे व शिवम सातपुते यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0