प्रितेश पावरा ह्यांना राज्यस्तरीय आदर्श युवा आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर.. (!सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )अक्राणी तालुक्यातील मुंगबारी (धनाजे बुद्रुक) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश वनसिंग पावरा यांनी सामाजिक क्षेत्रात काही वर्षांत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच कमी वयात सामाजित कामात त्यांच्या उत्कृष्ट शैलीत आदिवासी पावरा जात समाजाच्या संवर्धन संस्कृतींचे जतन त्याबरोबर पावरा जात ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या ब्लॉग मार्फत नेटक्या पर्यंत आदिवासी संस्कृतीचे प्रसारण करण्यात मोठे योगदान आहे. तसेच सातपुड्यात विविध उपक्रम राबवून सामाजिक सेवा देत आहेत. याबद्दल गरुड फाउंडेशनच्या वतीने पावरा ह्यांच्या कार्याशी दखल घेऊन पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र युथ युवा आयडॉल समाजरत्न पुरस्कार -२०२४ देण्यात येणार आहे या यशाबद्दल प्रितेश व्हि.पावरा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0