*बाल विवाह मुक्त भारत हा कार्यक्रम के एम हायस्कूल जत येथे साजरा...! (*इम्रान शेख प्रतिनिधी जत )दिनांक 27/11/24 रोजी नवि दिल्ली येथे मा मंत्री, महिला व बाल विकास 'बाल विवाह मुक्त भारत' मोहिमेच्या अंतर्गत शुभारंभ करण्यात आला. या अनुषंगाने KM हायस्कुल जत येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला संरक्षण अधिकारी सौ शिवनेरी केदार मॅडम, जेऊर सर, आंबेडकर शेती विकास संस्था जत तालुका समुदाय कार्यकर्ती राजमती कांबळे, जिल्हा समन्वयक आयेशा सोनीकर, मुख्याध्यापक सोलापूरे सर, पत्रकार मोहम्मद शेख, अंगणवाडी प्रतिनिधी कटरे व पाथरुट मॅडम उपस्थित होत्या.के एम हायस्कूल चे मुख्याध्यापक एम एस सोलापूरे सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शिवनेरी केदार मॅडम यांनी मुलांना बालविवाह संबंधी मार्गदर्शन केले. राजमती कांबळे मॅडम यांनी मुलांना व शिक्षकाना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

