अंबरनाथ येथे एअरमेल सॉर्टिंग डिव्हिजन व मुंबई जीपीओ, विभाग यांच्या संयुक्त द्विवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले.

अंबरनाथ येथे एअरमेल सॉर्टिंग डिव्हिजन व मुंबई जीपीओ, विभाग यांच्या संयुक्त द्विवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले. 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : दिनांक 26 जुलै रोजी अंबरनाथ येथे एअरमेल सॉर्ट्रिंग  डिव्हिजन सेंट्रल आणि मुंबई जीपीओ विभाग यांच्या संयुक्त विदमाने दुवार्षिक अधिवेशन  उत्साहात पार पडले  या अधिवेशनास ऑल इंडिया पोस्टल एस.सी./एस.टी वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल ( नवी दिल्ली) मा. जयरामजी जाधव साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.आणि त्यांनी मार्गदर्शन करत प्रेरणादायी संदेश दिला. 
या प्रसंगी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. 
सेंट्रल सॉर्टिंग डिव्हिजन येथे 
अध्यक्ष- श्री कमलेश जोशी साहेब  , डिव्हिजनल सेक्रेटरी - श्री.सुरेश रोडेवाड , डिव्हिजनल कार्याध्यक्ष - श्री. निलेश जाधव साहेब , 
विभागीय खजिनदार म्हणून श्रीमती.नयना जगताप मॅडम 
तसेच ऐरोली पार्सल हब शाखा निवड पण करण्यात आली.श्री श्रीरंग वाजे साहेब - शाखा अध्यक्ष श्री सुनील सोनवणे साहेब - शाखा सचिव श्री एस.टी.वैरागडे साहेब-शाखा खजिनदार 
यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली . नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा मा. जयरामजी जाधव साहेब यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला हा क्षण सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला.
Previous Post Next Post