*‘No Return–No Exchange’ अट लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे निर्देश* *माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीची दखल*

*‘No Return–No Exchange’ अट लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे निर्देश*
 *माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीची दखल* 


(महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक जाकीर तडवी)

  *प्रतिनिधी : ग्राहकांना "एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही" किंवा "No Return / No Exchange" अशी अट लावणाऱ्या दुकानदारांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा निर्णय माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला आहे.*  
*ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ नुसार* *(Consumer Protection Act, 2019):*
*कलम 2(47) नुसार Unfair Trade Practice* *(अन्यायकारक व्यापार पद्धती) मध्ये ग्राहकांचे हक्क*
*मर्यादित करणाऱ्या अटींचा समावेश होतो.*      
*अशा अटी अन्यायकारक व्यापार पद्धतीत मोडतात. त्यामुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत हा विषय मांडून व्यापारी संघटनांना आवश्यक सूचना देण्याचे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.*
Previous Post Next Post