*महाराष्ट्रात लाडक्या बहिणी असुरक्षित- खासदार शरद पवार.पारोळ्यातील सभेत महायुती विरोधात निशाणा. (पारोळा ता.११)आजवर महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेला भुलभुलय्या दाखवत त्यांची दिशाभूल केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हे राज्यातील महिलांना भुरड घालत आहे. मात्र महिलांच्या सुरक्षतेबाबत ते भूमिका स्पष्ट करत नाही. राज्यात आजवर नऊ हजार मुली बेपत्ता आहेत. याबाबत राज्यकर्ते उदासीन आहेत. शेतकऱ्यांबाबत धोरण नाही, वाढत्या शेतकरी आत्महत्या याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले असून त्यांना धडा व शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पारोळ्यातील एन ई एस हायस्कूल येथे झालेल्या जाहीर सभे प्रसंगी बोलत होते. यावेळी उमेदवार डॉक्टर सतीश पाटील, अमळनेर चे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,उबाठा गटाचे माजी लोकनेते नगराध्यक्ष करण पवार, माजी जि प सदस्य रोहन पाटील, बाजार समिती संचालक अडवोकेट रोहन मोरे, बाजार समिती संचालक जिभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांच्यासह शरद चंद्र पवार पक्ष, आय काँग्रेस व उबाठा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार शरद पवार यांनी देशातील महाराष्ट्रा राज्याची आताची असलेली वाटचाल तसेच राज्यकर्ते यांच्याकडून होणारी नागरिकांची फसवणूक, शेतकऱ्यां बाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीचा जाहीरनामा सांगितला. तर डॉक्टर सतीश पाटील यांच्या राजकीय निवृत्तीचा निर्णय हे आपण घेणार असून ते पुढे देखील राजकारणात सक्रिय असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. यावेळी आय काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे, धुळे येथील शकील अहमद, एरंडोल चे जगदीश पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,उबाठा पक्षाचे करण पवार यांनी आपल्या मनोगतात महायुतीवर खडे बोल सुनावले. चौकट -निष्ठेमुळे आपल्याला उमेदवारी डॉक्टर सतीश पाटील गेल्या 30 वर्षापासून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय जीवन सुरू आहे. त्या निष्ठेचे फळ आपल्याला मिळालेली उमेदवारी आहे. येणाऱ्या काळात देखील पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मधून काम करणार असल्याचे त्यांनी सांगून नागरिकांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले. शेवटी आभार संतोष महाजन यांनी मानले.छाया -पारोळा - जाहीर सभेत मार्गदर्शन करतांना खासदार शरद पवार व्यासपीठावर डॉक्टर सतीश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी*
byMEDIA POLICE TIME
-
0