जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांचा राजीनामा, आज वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश. ((शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) ऐन निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाला धक्का.सेलू : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी ऐन निवडणुकीत शिवसेने च्या जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा दिला असून सोमवारी ते वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करणार आहेत.सेलू तालुक्या तील वालूर येथील सरपंच व एक बडे प्रस्थ असलेले संजय साडेगावकर यांनी ऊबाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा देऊन शिवसेनेला ऐन निवड णुकीच्या तोंडावर दणका दिला असून शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.गेल्या काही दिवसापासून संजय साडेगावकर हे शिवसेनेत उबाठा गट विचलित होते. साडेगावकर यांच्याकडे पाथरी व जिंतूर हे दोन विधानसभा मतदार संघ सोपवण्यात आलेले होते. मात्र या दोन्ही मतदार संघाबाबत त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नव्हता त्यामुळे त्यांनी रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उबाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून सोमवारी वालूर येथे वंचित बहुजन आघाडी चे जिंतूर सेलू मतदार संघाचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या उपस्थिती त वालूर येथे सकाळी 11 वाजता ते वंचित मध्ये प्रवेश करणार आहेत.त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एक तडका फडकी निर्णय घेऊन त्यांनी राजकारणात मोठा निर्णय घेऊन शिवसेनेला भगदाड पाडले आहे याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0