पाडवी पिता पत्रातील कटुता नष्ट माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा राजीनामा करणार पुत्राचा प्रचार. (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार तळोदा माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा राजीनामा❗भाजप चा प्रचार करणार ‼️ शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी महाविकास आघाडी वर अनेक आरोप करत आपला व त्यांच्या सोबत शहादा तळोदा विधानसभा क्षेत्रातील 91 पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत पक्ष सदयसत्वाचा राजीनामा देत भाजपाचे उमेदवार तथा सुपुत्र आ राजेश पाडवी यांचा प्रचार करणार असल्याचे आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.तिकीट वाटपाआधी आजी माजी आमदार पाडवी पिता पुत्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत होते परंतु काँग्रेस ने निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही तसेच संपूर्ण जिल्ह्यात चारही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली असतांना पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात फक्त शहादा तळोदा मतदार संघातील बंडखोरांनी माघार घ्यावी यास्तव हेलिकॉप्टर ने आले व त्यांनी सर्वांना फॉर्म मागे घ्यायला लावले मग इतर तीन विधानसभा मतदार संघातील बंडखोरांचा बंदोबस्त त्यांनी का केला नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा केला व या साठीच महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट काँग्रेस ने दिले असते तर आम्ही हा निर्णय घेतला नसता परंतु जो उमेदवार पक्षाच्या साधा सदस्य सुद्धा नाही व लोकसभा निवडणुकीत ज्यांनी भाजप साठी पदाधिकारी म्हणून काम केले अश्या उमेदवाराला ऐनवेळी काँग्रेस ने निष्ठवंतांना डावलून उमेदवारी दिली म्हणून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत व ते सुद्धा माझ्या सोबत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातच काम करतील असे सुद्धा त्यांनी पुढे स्पष्ट केले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस सोबत महाविकास आघाडी ला जबरदस्त धक्का बसला असून मतदार संघात खळबळ माजली आहे.उदेसिंग पाडवी यांच्या या निर्णयाने शहादा तळोदा मतदार संघात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडून संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे उदेसिंग पाडवी यांनी जिल्ह्यातील आघाडीत बिघडी होऊ नये व इतर तीन विधानसभा क्षेत्रातील निष्ठावंत उमेदवारांना त्रास होऊ नये यास्तव भाजप प्रवेश सध्या करणार नाही असे सुद्धा या वेळी आवर्जून सांगितले सध्या आमचा विरोध फक्त आघाडीने आयात केलेल्या उमेदवार राजेंद्र गावित यांनाच असेल असे सांगितलेउदेसिंग पाडवी हे माजी आमदार असून 2014 मध्ये ते शहादा तळोदा मतदारसंघातून भाजप च्या तिकिटावर निवडून आले होते त्या नंतर त्यांच्या नेतृत्वात झालेल्या शहादा व तळोदा नगरपालिकेत त्यांनी भाजप चा झेंडा फडकवला होता तसेच पंचायत समित्यांवर सुद्धा भाजप चे वर्चस्व अबाधित ठेवले होते 2019 मध्ये त्यांच्या सुपुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी भाजप ने दिली म्हणून त्यांनी नंदुरबार विधानसभेत काँग्रेस च्या तिकिटावर मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा निर्णय महायुती च्या पथ्यावर पडणारा असून काँग्रेस चे पारंपरिक मतदार पुन्हा एकदा भाजप कडे वळणार आहेत यामुळे मतदार संघातील चुरस वाढणार आहेचौकट - माजी आ उदेसिंग पाडवी यांच्या या निर्णयाने आजी माजी आमदार असलेल्या पिता व पुत्र राजेश पाडवी यांच्यातील कटुता संपुष्टात आल्याने महायुतीत आनंदाचे तर महाविकास आघाडीतील पिता पुत्रात भांडण लावणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे

पाडवी पिता पत्रातील कटुता नष्ट माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा राजीनामा करणार पुत्राचा प्रचार.                          
Previous Post Next Post