मोदींनी देशात सत्तेचा गैरवापर करत फोडाफोडीचे राजकारण केले. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)विजय भांबळे यांच्या प्रचार सभेला अलोट गर्दी. सेलू : देशात व राज्यात मोदींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून विरोधकांना इडी,सी.बी.आय. या यंत्रणेचा वापर करीत त्यांना जेरीस आणून त्यांच्या वर खोटया केसेस दाखल करून फोडाफोडीचे राजकारण करीत आपल्या पक्षात सामील करून सरकार पाडणे असे कृत्य केल्याचे त्यांनी आज सेलू येथे सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत व्यक्त केले. शुक्रवार दि. 8 नोव्हें. रोजी दुपारी दोन वाजता सुरु होणारी सभा थोडी उशीरा सुरु झाली.व्यासपीठावर महिलाध्यक्ष फौजीया खान, जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे,खासदार संजय जाधव ,उमेदवार विजय भांबळे,हेमंत राव आढळकर,माजी जि.प.सभापती राजेंद्र लहाने,अशोक नाना काकडे, राम खराबे नाना, अजय चौधरी,सुधाकर रोकडे,संजय साडेगावकर,प्रकाश मुळे अडीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोकसभेची निवडणुकीत सर्व विरोधी पक्षाने एकजुट दाखविल्यामुले यश संपादन करता आले.सरकार फोडाफोडी व इतर सर्व कार्यवाहीवर लक्ष केंद्रित करून वातावरण खराब करण्याचे कार्य करत आहे. देशातील इतर सर्व प्रश्नांवर त्यांचे अजिबात लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव नाही,शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर काही तोडगा काढायचा नाही, त्यांचे प्रश्न तसेंच प्रलंबित ठेवायचे.मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. उत्पादन खर्च निघणे कठीण झाले.ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर महाविकास आघाडी चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. देशात परिवर्तन करण्यासाठी आपण विजयरावजी भांबळे यांना बहुमताने निवडून देणे आवश्यक आहे. महिला गुन्हेगारी वाढत आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, बेरोजगारी वाढत आहे,प्रत्येक क्षेत्रात भष्टाचार वाढला आहे. जेलच्या भीतीमुळे काही लोक पक्ष सोडून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी भीतीपोटी बीजेपी मध्ये सामील झाले आहेत. अश्या अनेक मुद्याला हात घालीत त्यांनी विविध योजनाची माहिती दिली.याप्रसंगी विजय भांबळे यांनी आपल्या मनोगतात मा.शरद पवार साहेबासोबत हेलिकॅप्टर मधून लोअर दुधना प्रकल्पाचा किस्सा सांगितला,ते म्हणाले 1996 ला साहेब साईबाबा सहकारी बँकेच्या उदघाटणाला आले होते.तसेंच लोअर दुधना प्रकल्पाचे उदघाट्न साहेबांनी केले असल्याचे सांगितले.त्याचं बरोबर त्यांनी आपल्या भाषणात मी कधी भष्टाचार केला नाही मी सदैव जनतेची सेवा केली असे म्हणत त्यांनी विध्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या वर टिका केली.भावनिक साद घालत जनतेनी मला मुलगा म्हणून निवडून द्यावे अशी साद घातली.यावेळी खासदार संजय जाधव,फौजियाखान,विजय गव्हाणे,संजय साडेगावकर,कैलास महाराज, राजेंद्र लहाने,अशोक उफाडे,आदिनी आपल्या नेहमीच्या शैली मध्ये विरोधी आमदारावर टिका करीत विजयरावजी भांबळे साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करा असे सांगितले.सूत्र संचालन राठोड यांनी केले तर आभार अशोक नाना काकडे यांनी व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0