पाडळसे शिवारात बिबट्याची दहशत कायम; ग्रामस्थ भयभीत***. (*पाडळसे, [17 ऑगस्ट]:*)* यावल तालुक्यातील पाडळसे गावाच्या शिवारात बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावूनही अद्याप तो जेरबंद न झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.गेल्या काही दिवसांपासून पाडळसे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि मजुरांनी बिबट्याला अनेक वेळा पाहिले आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असून, एकट्याने शेतात जाण्यास नागरिक घाबरत आहेत.ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. लहान मुलांना घराबाहेर खेळायला पाठवतानाही पालक धास्तावलेले आहेत. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.---
byMEDIA POLICE TIME
-
0