भारतीय जनता पार्टी घोडपेड यांच्या सौजन्याने भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन.. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.22:-घोडपेड: भारतीय जनता पार्टी घोडपेठ यांच्या सौजन्याने तसेच भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. रघुवीर अहिर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा सण पोळा निमित्त भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास राष्ट्रीय मागास आयोग अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर, पितृतुल्य श्री हरीभैय्या अहिर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्र शिंदे, माजी उपमहापौर चंद्रपूर महानगरपालिका श्री अनिलभाऊ फुलझले,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती शहर अध्यक्ष सुनिल नामोजवार, पूनम भैया तिवारी,घोडपेठ सरपंच अनिल खनके, उपसरपंच प्रदिप देवगडे, श्यामल अहिर, माजी सदस्य जिल्हा परिषद विजय वानखेडे,विश्वनाथ निमकर, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे, अर्जुन लांजेवार विश्वहिंदू परिषद,अशोक येरगुडे व भारतीय जनता पार्टी सर्व विंग चे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. या वेळी लहान चिमुकल्यांनी देखील आकर्षक देवांची वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बैलजोड्यांची देखणी सजावट, चिमुकल्यांचे निरागस हास्य आणि गावकऱ्यांचा उत्साह यामुळे परिसर आनंदमय झाला. पोळा हा शेतकऱ्यांचा सण असून बैलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या पारंपरिक उत्सवात समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
byMEDIA POLICE TIME
-
0