*समता दिन आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन* (पारोळा यशवंत पाटील) पारोळा :- येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे समता दिन आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.ज्योतिबा गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. अश्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष रविंद्र पाटील संचालिका रूपाली पाटील प्राचार्य, पि. एस. पाटील, अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर , वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

*समता दिन आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*        
Previous Post Next Post