*शितल अकॅडमी येथे, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली* (पारोळा यशवंत पाटील) पारोळा :- येथील शितल अकॅडमी येथे , महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिका व कमवा (learning + earning) चा कार्यक्रम घेण्यात आला. शितल अकॅडमी येथे सातत्याने सुरू असलेल्या उपक्रम म्हणजे शिका व कमवा (learning +earning ) यामुळे विद्यार्थांना स्वकमाई चे महत्व कळते. विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विताविना शत्रू खचले, इतके अनर्थ एका अविद्येतेने केले. महात्मा ज्योतिबा फुले... कार्यक्रमाची महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील तसेच, प्राचार्य मंगेश पवार व उपप्राचार्य दिपाली शिंपी व हेमंत परदेशी होते. या प्रसंगी सर्व शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुले यांचे बालपण अनेक संकटात गेले. त्याची आई वारली तेव्हा तो फक्त ९ महिन्यांचे होते. आर्थिक विवंचनेमुळे वडिलांना शेतात मदत करण्यासाठी त्यांना लहान वयातच अभ्यास सोडावा लागला. पण शेजाऱ्यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलांनी त्याला स्कॉटिश मिशन्स हायस्कूलमध्ये दाखल केले. वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. १९४८ मध्ये ज्योतिबांच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा ते त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्नात वराच्या नातेवाइकांनी खालच्या जातीचा असल्याने अपमान केला. यानंतर त्यांनी ठरवले की आपण सामाजिक विषमता उखडून टाकण्यासाठी काम करू कारण जोपर्यंत समाजातील महिला आणि निम्न जातीच्या लोकांचे उत्थान होणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास अशक्य आहे. १९७१ मध्ये थॉमस पेनच्या 'राइट्स ऑफ मॅन' या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.विद्यार्थ्यांनी हे त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. व यशस्वी रित्याने कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मनस्वी पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

शितल अकॅडमी येथे, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली*                                              
Previous Post Next Post