पाडळसे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा.. . (सुरेश खैरनार पाडळसे )- 26 जानेवारी 2025 रोजी पाडळसे गावाच्या जि.प.च्या शाळेत शिकणाऱ्या मुला, मुलींनी लेझीम नृत्य व इतर देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून सर्वांचेच मन मोहित केले. यावेळी विजय लक्ष्मण कोळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळसे कन्या ,पाडळसे बॉईज व पाडळसे उर्दू या तीनही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना पेन बक्षीस दिले.विजय कोळी म्हणाले, मी पेन बक्षीस म्हणून यासाठी दिले, कारण सध्याची परीस्थिती फारच कठीण होउन बसली आहे. आणि येणाऱ्या काळात जो शिकेल तोच टिकेल. शिकलेल्यांनी आपल्या पेनाचा वापर शिक्षकां प्रमाणे ज्ञानार्जनासाठी करावा, पत्रकारां प्रमाणे शस्त्रा सारखा करावा, पोलीसांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने एकच व्यक्ती घायाळ होईल, पण आपल्या लेखनीच्या जोरावर अख्खा समाजच जागृत करावा. एखाद्याला आपण बक्षीस देणे, म्हणजे त्याने केलेल्या कार्याचा गौरव होय. त्या बक्षीसाला मुल्य नसते. नुसती कौतुकाची एक थाप सुद्धा माणसाला लढण्यास प्रवृत्त करते. म्हणुन माझा हा छोटासा प्रयन्त मी केला. सदर प्रसंगी जि प मराठी मुलांची, मुलींची, ऊर्दु शाळा ंचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हजर होते.नुकताच श्री विजय कोळी यांना आळंदि येथे महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र योद्धा म्हणुन पुरस्कारही मिळाला आहे.

पाडळसे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा..                                                                             
Previous Post Next Post