मारूळ येथील नरेश मासोळे गोल्ड मेडलने सन्मानित. (.पाडळसे सुरेश खैरनार )ओपन पावर लिफ्टिंग कॉम्पिटिशन आयोजक जी एस फिटनेस पावर लिफ्टिंग टीम भुसावळ 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या पावर लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये ईगल जिम सावदा तर्फे मास्टर ग्रुप मध्ये नरेश बाबुराव मासोळे यांना बेंच प्रेस मध्ये एक गोल्ड मेडल आणि डेड लिफ्ट मध्ये एक गोल्ड मेडल देऊन स्पर्धेचे आयोजक सर गौरव पाटील यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले व सब ज्युनियर कॅटेगरीमध्ये सय्यद मोहम्मद साकिब यांना डेडलीफ मध्ये एक गोल्ड मेडल व बेंच प्रेस मध्ये एक ब्रांझ मेडल सर गौरव पाटील यांच्याद्वारे देऊन सन्मानित करण्यात आले वरील दोघे हे ईगल फिटनेस जिम सावदा या जिमचे सदस्य आहेत व जिम द्वारे त्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांना इगल जिमचे संचालक व ट्रेनर सर फिरोज पटेल यांनी ट्रेनिंग व मार्गदर्शन केले व त्यांच्या नेतृत्वात त्यांनी पदकांचे संपादन केले दोघांचा ग्रामपंचायत मारूळ व ग्रामस्थां द्वारे ही सत्कार करण्यात आला

मारूळ येथील नरेश मासोळे गोल्ड मेडलने सन्मानित.                  
Previous Post Next Post