**जेष्ठनागरिक स्व, शेषराव वामनराव काळे यांच्या अस्तीरक्षेवर वृक्षारोपण करून घडविला आदर्श**. (प्रतिनिधी/ अनिल चव्हाण).*मानवत तालूक्यातील सावळी येथील जेष्ठ नागरिक कै श्री शेषराव वामनराव काळे यांचे दिनांक २५ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सावळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. तर आज दिनांक २७ जानेवारी रोजी हिंदू प्रथेप्रमाणे अस्ती रक्षा सावडण्यात आली. त्यावेळी त्यांची आठवण म्हणुन सावळी स्मशान भूमीत त्यांचा स्मरणार्थ एक वृक्ष त्यांचा मुलगा भगवान शेषराव काळे यांच्या हस्ते लावण्यात आले. समाज परिवर्तन शिल बनत चालला असल्याने समाजातील रूढी परंपरेला बगलदेत आज स्व, काळे यांच्या अस्तीच्या एक मूठ रक्षा वर एक वृक्ष लावून समाजात एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला. समाज परिवर्तनशिल युवकांच्या माध्यमातून करण्यात आला. काळे यांच्या या उपक्रमा मुळे सावळी ग्राम पंचायतीच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.***
byMEDIA POLICE TIME
-
0