**कूंभपर्व, गंगास्नान व आमवस्या या त्रिवणी संगमामूळे रत्नेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मायंदळी. (*मानवत / प्रतिनिधी.)मानवत पासून जवळच असलेल्या पाथरी तालूक्यातील गोदावरी काठावर वसलेल्या रत्नेश्वर रामपूरी येथील भगवान रत्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व कूंभपर्वातील गंगास्नान करण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी जमली होती.सविस्तर वृत्त असे की,मानवत जवळच असलेल्या पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले प्राचिन ग्राम रत्नेश्वर रामपूरी , भगवान रत्नेश्वरांच्या नावावरूनच प्राचिन काळापासून रामपूरी ला ओळखले जाते. भगवान रत्नेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या गोदावरीच्या तटावर भव्यदिव्य भगवान रत्नेश्वराचे प्राचिन मंदीर आहे. पाथरी, सोनपेठ, मानवत, या तालूक्याच्या मध्यभागी व सिमेवर असल्याने तसेच विस्तीर्ण असा गोदावरीचा काठ लाभल्यामूळे आज कूंभपर्व व आमवस्या असल्यामूळे भाविकांची गंगास्नान व भगवान रत्नेश्वराचे पवित्र दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.तर मानवत,पाथरी, सोनपेठ, माजलगाव , सेलू तालूक्यातून भाविक गंगास्नान व दर्शनासाठी आले.त्यामूळे गोदावरीच्या काठावर भक्तांचा मेळा पाहावयास मिळाला..

कूंभपर्व, गंगास्नान व आमवस्या या त्रिवणी संगमामूळे रत्नेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मायंदळी.                    
Previous Post Next Post