प्रजासत्ताक दिनी शाळेत झेंडावंदन न करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी.. ( उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी)शहादा : २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मंदाणे तालुका शहादा या शाळेत झेंडावंदन न साजरा करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एक निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कैलास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0