**बाग फूलावी म्हणून माळी बागेची काळजी घेतो ; त्या प्रमाणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हेच शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे.**@)> गटशिक्षणाधिकारी- मनोज चव्हाण.*. (मानवत प्रतिनिधी. / अनिल चव्हाण. ) @९५२७३०३५५९-—————————————मानवत येथील गटसाधन केंद्राच्या माध्यमातून येथील जिल्हा परिषदेच्या ४ कूला मध्ये २०३ प्रथमिक, माध्यमिक, व उच्चमाध्यमिक स्तरावरील शिक्षक व भगीणींना तज्ञ सूलभकांच्या माध्यमातून *शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.0 मानवत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आ. श्री, मनोज चव्हाण यांच्या सखोल मार्ग दर्शनाखाले ५ दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले.सविस्तर वृत्त असे की, मानवत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या व गटसाधन केंद्र मानवत यांच्या माध्यमातून दिनांक१७ फेब्रूवारी ते २२ फेब्रूवारी या ५ दिवशीय *शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण* या प्रशिक्षणाचा आज समारोप मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाले संपन्न झाला. यावेळी समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा.मनोज चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की या ५ दिवशीय प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले असून जसे बाग फूलावी म्हणून माळी बागेची काळजी घेतो त्या प्रमाणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हेच शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे.या वेळी प्रास्ताविक करतांना शिक्षण क्षेत्रात नित्य होत असलेल्या बदला विषयी त्यांनी आपले मत मांडले तर आपल्या राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी निवडक विषयांवर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात आले होते. यावर्षी उर्वरित विषयांचे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामधून सर्व स्तरावरील शिक्षकांची क्षमता बांधणी करून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा मुख्य उद्देश आहे, तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणेचेही सक्षमीकरण करणे महत्त्वाचे आहे. या धोरणामध्ये राष्ट्रीय शिक्षण शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे ध्येय जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा त्यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचार प्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र, विविध धोरणे इ. विषयी अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील तरतुदींनुसार परिच्छेद क्र. ५.१५ आणि ५.१६ मध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक शिक्षकाचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD) होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षा मध्ये किमान ५० तासांचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. तर जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन यांचा परस्परसंबंध आणि त्यानुसार मुलांचे अध्ययन कसे होते, तसेच वर्गातील आंतर क्रिया याचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्ञान आणि कौशल्ये शिक्षकांना आत्मसात व्हावीत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे. यासाठी शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील म्हणजेच इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांना 'शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०' प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेचाही यात समावेश करण्यात आला आहे.घेण्यात आलेल्या प्रशिक्षणा मध्ये शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण हे विषय निहाय नसून एकात्मिक स्वरूपाचे आहे. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर (SCF-FS), राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (SCF-SE) २०२४, समग्र प्रगतिपत्रक (HPC), क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन- अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती, प्रश्ननिर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये, उच्चस्तरीय विचारप्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा २०२४-२५ (SQAAF) इत्यादी विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तर असे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०: शिक्षक मार्गदर्शिकांनी पाच ५ दिवस दोन सत्रा मध्ये प्रशिक्षण दिले असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.यावेळी उत्कृष्ट कार्य केलेले माणिक पूरी (पक्षीमित्र ) उमाकांत हाडूळे या मान्यवर शिक्षकांचा सत्कार मा.गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षक - भगीणींनी आप आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन तज्ञमार्गदर्शक राजकूमार गाढे , विलास मिटकरी यांनी केले तर यावेळी दिलीप दादा लाड, ऊमाकांत हाडोळे, बलभीम माथेले, नितिन इंगळे ,यांनीमनोगत व्यक्त केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार उमाकांत हाडूळे यांनी मानले व प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.यावेळी गटसाधन केंद्राच्या वतीने सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली. यावेळीसर्व शिक्षक बांधवांनी या समारोप प्रसंगी स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आनंद घेतला...
byMEDIA POLICE TIME
-
0