बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )सेलू :३९५ शिवजयंती चे औचित्य साधून सेलू येथील बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .शिवजयंतीच्या निमित्ताने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये माता पालकां साठी जिजाऊ एक आदर्श माता व पुरुष पालकांसाठी जाणता राजा शिवछत्रपती या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली .माता पालकांसाठी राजमाता जिजाऊ व शिवबा फोटो स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होते त्याचबरोबर विद्यार्थ्यां साठी घेतलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यानंतर इयत्ता ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,चौथी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य रूपात शिवचरित्र सादर केले.निबंध व राजमाता जिजाऊ व शिवबा फोटो स्पर्धेत विजेते झालेल्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी नूतन विद्याल य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्य नारायणजी लोया उपाध्यक्ष डी. के देशपांडे सहचिटणीस जे .बी बिहानी बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष पी आय बिनायके, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील कार्यकारणी तील सन्माननीय सदस्य दत्तरावजी पावडे नाना,नंदकिशोर जी बाहेती डॉ.शरद कुलकर्णी अडीजण व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0