*संत शिरोमणी संत गूरू रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त , त्यांच्या जिवनचरित्र्यावर घेतलेला आढावा.*—————————————————सर्वांना प्रथमतः जय रविदासमानवतावादी परिवर्तनवादी विज्ञानवादी महान संत, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... मध्ययुगीन युगामध्ये म्हणजेच 13व्या, 14 व्या शतकाच्या कालखंडामध्ये संत रविदास महाराजांचे स्थान लोकप्रियतेच्या दृष्टीने खूप उच्च होते कारण त्यांची कुशाग्र बुद्धी आणि परिवर्तनवादी ज्ञानामुळे प्रस्थापित अंधश्रद्धाळू व कर्मकांड यांच्या विरोधात ते अगदी निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करत असत. याच कालखंडामध्ये दिल्लीचा सुलतान दिल्लीचा बादशहा सिकंदर लोधी आणि महाराजांची भेट झाल्याचा उल्लेख आपणास आढळतो त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याकाळी महाराजांच्या कार्याविषयी सिकंदर लोधी हे ऐकून होते त्यामुळे त्यांनी आपल्या शिपायाच्या माध्यमातून त्यांना बंदी करून घेतलं आणि कारागृहात टाकले त्यांचा उद्देश हा संत रविदास महाराज यांना हिंदू पासून मुस्लिम बनवण्याचा होता याकरिता त्यांनी अनेक प्रकारचे प्रलोभने देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संत रविदास महाराज यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही याच काळामध्ये त्यांनी आपल्या विविध शिपायांच्या माध्यमातून त्यांच्याविषयी माहिती संग्रहित केली त्यावेळेस त्यांना असे लक्षात आले की संत रविदास महाराज हे एक समानतावादी ,मानवतावादी परिवर्तनवादी संत आहेत त्यांचे कार्य हे गोरगरिबांसाठी दीनदुबळ्यांसाठी आहे हे सिकंदर लोधी यांना कळल्यानंतर त्यांनी महाराजांना आपल्या राजदरबारात बोलावून घेतले आणि ते म्हणाले महाराज मी तुमच्यावर खुश आहे तुमच्या कार्याचा मला खूप आदर आहे म्हणून तुम्हाला माझ्याकडून काय हवं ते सांगा ते मी तुम्हाला देण्यास तयार आहे त्याकाळी सिकंदर लोधी प्रचंड धनवान ,सोने नाणे हिरे,जव्हारात शेत शिवार युक्त असा श्रीमंत राजा होता त्यावेळी हे सर्व ऐकल्याच्या नंतर संत रविदास महाराज अतिशय प्रेमाने म्हणतात. *"ऐसा चाहू राज मै ,जहा मिले सबन को अन्न !छोट बडे सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न!"* हे राजा मला माझ्यासाठी काहीही नको तुला जर काही द्यायचेच असेल तर मला असा समाज पाहिजे असं राष्ट्र पाहिजे की त्या राज्यामध्ये कोणीही अण्णा वाचून उपाशी राहू नये प्रत्येकाच्या पोटाला अन्न मिळाले पाहिजे तसेच पुढे महाराज म्हणतात छोट बडो सबसम बसे रविदास रहे प्रसन्न कारण या देशांमध्ये या राष्ट्रांमध्ये या राज्यामध्ये लहान -मोठे गरीब श्रीमंत ,उच्च नीच्च,जातीभेद, धर्मभेद असा कुठेही भेदभाव होता कामा नये सर्वांनी एकमेका सोबत गुन्या गोविंदाने राहिले पाहिजे आपण सर्वजण एकच आहोत अशी इच्छा महाराजांनी सिकंदर लोधी यांच्या पुढे व्यक्त केली हा सर्व संवाद ऐकून हा सर्व उपदेश ऐकून सिकंदर लोधी अतिशय भारावून गेला आणि त्याच क्षणापासून संपूर्ण राज दरबारात सर्वांच्या समक्ष संत रविदास महाराज यांना गुरुस्थानी मानून त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. अशाच प्रकारे राज्यस्थान या राज्यातील चित्तोड येथील राजपूत घराण्यातील संत मीराबाई ह्या देखील संत रविदास महाराज यांच्या दोह्यावर ,त्यांच्या प्रवचनावर खूप खुश होत्या. त्यांच्या परिसरामध्ये संत रविदास महाराज यांचं प्रवचन सुरू होतं ते ऐकल्याच्या नंतर त्यांनी संत रविदास महाराज यांना आपल्या घरी बोलावून घेतलं त्यांनी अतिशय आदरपूर्वक आदरातिथ्य केलं त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील केली होती त्यावेळी संत मीराबाई यांनी संत रविदास महाराज यांना विनंती केली की त्यांनी मला शिष्य म्हणून परवानगी द्यावी मला आपल्याला गुरु करावयाचे आहे परंतु या गोष्टीला राजपूत लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होता तरी देखील त्या विरोधाला न जुमानता त्यांनी संत रविदास महाराज यांना गुरुस्थानी मानलेलं आहे. अशाप्रकारे त्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून वाणीच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून 52 राजे त्यांनी झुकविले अशी नोंद पहावयास मिळते.संत रविदास महाराज आपल्या दोह्याच्या माध्यमातून म्हणतात की "हम भी चामके ,तुमभी चामके, चामका है जग सारा ,चाम बिगर कोन जीव है ,कहे रविदास चमारा"या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवांचे मानवांचे शरीर हाड ,मांस आणि रक्तापासून बनलेलं आहे मग त्यामध्ये आपण भेदभाव का करावा कोणताही धर्म असो ,कोणतीही जात असो कोणताही पंथ असो हे सर्व मानवा समान आहेत मानव हीच जात सर्वात श्रेष्ठ आहे हे महाराजांनी दोह्याच्या माध्यमातून तेराव्या 14 व्या शतकामध्ये सांगितलेले आहे हे आपण या काळामध्ये देखील समजून घेतलं पाहिजे."ब्राह्मण मत पूजिय जो होवे गुण हीन पूजिए चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण" या दोह्याचा अर्थ असा की एखादा ब्राह्मण आहे पण त्याच्या अंगामध्ये कोणतीही गुणवत्ता नाही अंतर्मन शुद्ध नाही कोणताही चांगला उपदेश देऊ शकत नाही अशा ब्राह्मणाच्या पाया पडण्याची चूक आपण करू नये त्यास पुजू नये परंतु जर एखादा व्यक्ती चांडाल जरी असला तरी तो जर गुणवान असेल त्याचं मन शुद्ध असेल तो जर चांगला उपदेश देत असेल तर त्याच्या पाया पडायला काहीही हरकत नाही असे निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करणारे संत म्हणून संत रविदास महाराज यांचा नाम उल्लेख करण्यात येतो.अशा परखड शब्दांमध्ये महाराजांनी त्या काळामध्ये समाजप्रबोधनाचे कार्य केलेलं आहे ही आपल्यासाठी न संपणारी ऊर्जेची शिदोरी आहे असे आपणास म्हणता येईल. महाराज एका ठिकाणी प्रवचन करत असताना आपल्या दोघांच्या माध्यमातून म्हणतात की , "तोही- मोही ,मोही - तोही अंतर कैसा कनक कटिक जल तरंग जैसा"तुझ्यात आणि माझ्यात ,माझ्यात आणि तुझ्यात काय अंतर आहे ,काय फरक आहे तुझे हे शरीर हाड , मांस रक्तापासून बनलेला आहे त्याचप्रमाणे माझे देखील शरीर बनलेला आहे तर आपण दोघांमध्ये भेदभाव का करावा सर्वांनी एकमेकास सहकार्य करून सर्वांनी सुख दुःखात सहभागी झालं पाहिजे हे पटवून देण्यासाठी त्यांनी उदाहरण दिले ते म्हणजे 'कनक कटिक जलतरंग जैसा' जर आपण एखाद्या पाण्यामध्ये खडा किंवा दगड जर मारला तर त्यामुळे पाण्यामध्ये अनेक तरंग निर्माण होतात ते तरंग एकमेकास जोडलेले असतात म्हणजेच ते तरंग एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडून आणतात असे वास्तववादी उदाहरण महाराजांनी त्या काळामध्ये दिले हे आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजे.अशा अनेक दोह्यांच्या माध्यमातून महाराजांनी समानतेचा ,समतेचा मानवतेचा संदेश दिलेला आहे महाराजांच्या अनेक दोह्यापैकी 40 दोहे हे शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत त्या दोह्यांचे रोज वाचन स्मरण पठन केले जाते हे निश्चितच आपणासाठी अभिमानाची बाब आहे. महाराजांच्या कार्याचा नाम उल्लेख अनेक संतांनी देखील केलेला आहे त्यामध्ये संत नामदेव महाराज ,संत सेना नाव्ही, संत कबीर यांनी देखील आपल्या अभंगाच्या माध्यमातून महाराजांच्या कार्यांचा गौरव केलेला आपणास पाहावयास मिळतो.अशाच पद्धतीने जागतिक विद्वावान - कीर्तिवान असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 फेब्रुवारी 1953 मध्ये 555 जयंती दिल्ली सारख्या शहरांमध्ये साजरी केलेली आहे कारण महाराजांच्या कार्याचा विचारांचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता संत रविदास महाराज हे मानवतावादी ,समानतावादी, समतावादी आणि विज्ञानवादी विचारांचे कट्टर समर्थक होते. हा आपला इतिहास आहे जो की आपण वाचत नाही वाचणार असेल तर ऐकणारा ऐकत नाही हा आपला अज्ञानपणा आहे आणि याच अज्ञानपणामुळे आपण खऱ्या इतिहासापासून कोसोदूर आहोत हे या ठिकाणी अधोरेखित होते. याकरिता सर्व समस्त चर्मकार बांधवांनी विविध साहित्य वाचावे त्या साहित्याच्या माध्यमातून संत रविदास महाराज आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या कार्यांच्या विचारांचा प्रसार - प्रचार केला पाहिजे हा प्रमाणित हेतू या ठिकाणी व्यक्त करतो. *लेख संकलन* ( प्रा. माणिक चव्हाण. )श्री रोकडेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय पांगरा शिंदे.ता. वसमत जिल्हा हिंगोली..
byMEDIA POLICE TIME
-
0