आमदार अमोल जावळे यांची न्हावी ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट : अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव उघड. यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी रुग्णालयात अस्वच्छता आणि सुविधांचा मोठा अभाव त्यांना दिसून आला. वॉर्ड रूमच्या खिडक्या उघड्या होत्या, त्यांना ना जाळी होती ना दरवाजे, त्यामुळे स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवला.रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्याने एका रुग्णाला उपचार न मिळाल्याने परत पाठवण्यात आले. मात्र, आमदार जावळे यांनी त्याला थांबवून तात्काळ ड्रेसिंग करण्याचे आदेश दिले. यावेळी प्रसूती गृह आणि ऑपरेशन थिएटरही बंद असल्याचे आढळले.दररोज सुमारे १५० रुग्ण ओपीडीसाठी येत असले तरी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे चित्र त्यांना या प्रसंगी दिसले. शवविच्छेदन कक्ष (PM Room) देखील बंद असल्याने रुग्णालयाच्या अडचणी त्यांना आणखीन गंभीर जाणवल्या. आमदार अमोल जावळे यांनी रुग्णालयातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे सांगत, प्रशासनाला तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच, रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
byMEDIA POLICE TIME
-
0