पत्रकार संघाची माजरी येथे नवीन शाखा (!महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.10:- माजरी येथे दिनांक 9 /2/2025 रोज रविवारला महाराष्ट्र पत्रकार संघ, च्या वतीने बैठक घेऊन नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली , कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश पानसे सर, चंद्रपूर जिल्हा कार्यअध्यक्ष शंकर बोरघरे,तालुका उपाध्यक्ष महेश निमसटकर, तालुका संघटक पुंडलिक येवले, तालुका कार्याध्यक्ष पवन शिवणकर , तालुका सदस्य विनोद वांढरे ,तालुका सदस्य जितेंद्र माहूरे इत्यादीं मान्यवरांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती.तदनंतर माजरी येथील पत्रकार बंधूंनी ठराव घेवून सर्वानुमते माजरी पत्रकार संघाचे नियोजनात अध्यक्ष म्हणून दै. तरुण भारत तसेच सर्च टीव्ही पत्रकार अनिल इंगोले यांची माजरी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, दै. युवाराष्ट्र चे दर्शन अतुल वनकर यांची उपाध्यक्ष , दै. सकाळ चे चैतन्य कोहळे यांची सरचिटणीस पदी , दै.नवजीवन संदीप झाडे प्रसिद्धी प्रमुख ,दैनिक लोकशाही चे नाशिर शेख, दै. देशोन्नती चे प्रफुल ताजने , यांची संघटक पदी वर्णी लागली तर सदस्य म्हणून दैनिक अधिकरनामा चे वैभव निंबाळकर, दैनिक महासागर चे संदीप वनकर , पवन जिवतोडे, प्रमोद ढगे, इत्यादी सदस्यांचा कार्यकारणीत समावेश करवून ती जाहीर करण्यात आली.

पत्रकार संघाची माजरी येथे नवीन शाखा                                  
Previous Post Next Post