*श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथे अग्नीवर भरती पूर्व प्रशिक्षण जोश पूर्ण वातावरणात यशस्वी समरोप!* कवयत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेरयांच्या संयुक्त विद्यमाने ,महाविद्यालयाचा विदयार्थि विकास विभाग व युवती सभा अंतर्गत अग्नीवर भरती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या दरम्यान करण्यात आले होते. या शिबीरला महाविद्यालयाच्या 40 विध्यार्थ्यांनीं सहभाग नोंदवला .त्यांना अग्निवीर भरती पूर्व व पोलीस भरती पूर्व चे सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण या शिबीरात देण्यात आले. त्यात ग्रांउड व पेपर तसेच ड्रिलमार्च संदर्भातील सराव इ प्रशिक्षण होते सदर प्रशिक्षणा ला प्रशिक्षक म्हणुण धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुर NCC कैडेट युनीट चे सिनियर ऑफिसर अजय चौधरी, जुनियर ऑफिसर ओम राजपुत, ऋषिकेश पाटील, कृष्णा भावसार यांनी प्रशिक्षण दिले सदर कार्यक्रमाचा समारोप अतीशय जोशपूर्ण वातावरणात करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनील पाटील हे अध्यक्षस्थानी होते समारोप सोहळ्याला प्रमुख अथिती म्हणुण धनाजी नाना महाविद्यालयाचे कॅप्टन डॉ राजेद्र राजपुत, बी एस एफ रिटायर अधीकारी युवराज गाडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संदीप धापसे , डॉ ए.एन सोनार,डॉ एस चिंचोरे , प्रा चतुर गाडे, प्रा नरेद्र घुले,अग्निवीर पुर्व प्रशिक्षण समन्व्यक डॉ उमेश पाटील, युवती सभा प्रमुख डॉ स्वाती राजकुंडल , डॉ निता जाधव इ उपस्थीत होते. या प्रसंगी डॉ अनिल पाटील यांनी हा कार्यक्रम घेण्यामागे महाविदयालयात देशभक्ती तसेच विध्यार्थ्यांना पोलीस भरती, अग्नीविर भरती अशा भरती प्रक्रियेसाठी वातावरण तयार करणे असुन हे गरजेचे आहे तसेच या प्रकारचे उपक्रम नियमीत महाविदयालय स्तरावर राबवण्यात येतील.या उपक्रमांचा भरती साठी उपयोग करून घेण्याचा तसेच येणाऱ्या काळात महाविद्यालयात लवकरात लवकर एनसीसी युनिट सुरू होणार असुन त्याचा उपयोग आर्मीमध्ये तसेच अग्निवीर मध्ये भरती होणारे विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात होणार असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे पाहुणे कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी त्यांच्या मार्गदर्शन भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कमी वेळात प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले याचे कौतुक केले महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमात अनेक सामाजिक संधीच असतात पण हा उपक्रम अनोखा असून याचा उपयोग विद्यार्थ्यांच्याबौद्धिक व शारीरिक क्षमतांना वाव देणारा असून भविष्यात विध्यार्थ्यांमधून अनेक अधिकारी या माध्यमातून घडतील अशी आशा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उमेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा चतुर गाडे यांनी केले. सदर उपक्रम राबविण्यासाठी समन्व्यक डॉ उमेश पाटील, युवती सभा प्रमुख डॉ. स्वाती राजकुण्डल व विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशील धनले यांनी विशेष परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0