मुख्यध्यापिकेची विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ. हिंगोणा तालुका यावल जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप. (यावल अशोक तायडे जिल्हा प्रतिनिधी )हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला आहे. शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीत वागतात व विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थरात मनात येईल त्याप्रमाणे शिवीगाळ करतात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसापासून तक्रार करून सुद्धा या विषयावर कोणत्याही प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही.सदर मुख्याध्यापकांना स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाकडून सुद्धा बऱ्याच वेळा समज देण्यात आली, तरी पण मुख्याध्यापक मॅडमचा हेक्का काही कमी झाला असून त्यांची मुजोरी सुरूच आहे. अतिशय खालच्या थरात शिवीगाळ करत असल्यामुळे पालक संतप्त झाले आणि त्यांनी आज सकाळी शालेय व्यवस्थापन समिती, पालक वर्ग व गावातील ग्रामस्थ महिला यांनी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला कुलूप ठोकले.तसेच घटनास्थळी शिक्षणअधिकारी धनक साहेब यांनी मुलींच्या प्रतिक्रिया जानून आता पालकांची असे म्हणणे आहे की अशा मुलीणा शिवी गाळ करणाऱ्या शिक्षकांनावर शिक्षण अधिकारी साहेब काय कार्यवाही करतील या कडे हिगोंणा गावांतील लक्ष आहेअशा माथेफिरू मुख्याध्यापिकेवर कायदेशीर कारवाई करून यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षण समिती अध्यक्ष व सर्व संचालक गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी आज जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला अशा अनुचित प्रकार होत असून शाळेला कुलूप ठोकले.
byMEDIA POLICE TIME
-
0