**मौजे सावळी येथील वैकूंठधाम मोक्षभूमित विश्रांती विसाव्यासाठी बेंच भेट.*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————मानवत तालूक्यातील आदर्श ग्राम सावळी येथील एक गाव एक स्मशान भुमी. या वैकूंठधाम मोक्षभुमीचे बांधकाम चालू आहे. तसेच गावातील काही जाणकार व सुज्ञ नागरिकांनी सर्व श्री रामेश्वर भास्करराव काळे, बाळासाहेब तुकाराम काळे (पोलिस पाटील)दत्तराव आसारामजी काळे (चेअरमन), हनुमान (गोटुभैय्या) कारभारी काळे सिद्धेश्वर भिमराव काळे, यांनी वैकूंठधाम मोक्षभुमी मध्ये स्वखर्चाने एक एक बेंच (बाकडे ) भेट म्हणून दिले आहेत. त्या बद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सन्माननिय सदस्य व सावळी समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने या भेट उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करुन त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली ते आदर्श ग्राम सावळीचे अध्यक्ष अशोकराव काळे यांचे सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करुन आभार व्यक्त करण्यात आले.भविष्यात गावकऱ्यांच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यात एक आगळी वेगळी वैकूंठधाम मोक्षभुमी तयार करून, सर्वच सण, उत्सव तिथे साजरा करण्याचे सावळी ग्रामस्थांचे मानस आहे. मौजे सावळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामूळे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. तर या उपक्रमासाठी अनेकजन परिश्रम घेत आहेत त्यासर्वाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नामदेवराव पाडूरंगजी काळे पाटील यांनी कौतूक करून अभिनंदन केले.***
byMEDIA POLICE TIME
-
0