*मंत्री संजयजी सावकारे व आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते डॉ नरेंद्र महाले यांचा सन्मान*. श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ,सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉ नरेंद्र दिनकर महाले यांचा वस्त्रोद्योग मंत्री मा श्री संजयजी सावकारे साहेब व आमदार श्री अमोल जावळे यांच्या सन्मान करण्यात आला. डॉ नरेंद्र महाले यांना लोकराजा राजश्री राजर्षी शाहू महाराज आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार व राष्ट्रीय पर्यावरण योद्धा 2024 हा दिल्लीच्या संस्थेकडून दिला जाणारा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रावेर यावल मतदार संघामध्ये मतदानाविषयी जनजागृती करून आपल्या प्रबोधन शैलीतून फेसबुक, इंस्टाग्राम ,रोडशो ,पथनाट्य कीर्तन व इतर प्रकारातून अत्यंत प्रभावी प्रणे मतदारा ंमध्ये जागृती केल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री सावकारे साहेब व आमदार अमोल जावळे यांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय बोरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश सेठी, युवाजिल्हाध्यक्षअनिल टोंगे व इतर मान्यवर उपस्थित होते. या सत्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी व त्यांच्या संपूर्ण सभासदांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0