महाशिवरात्री निमित्त साईबाबा मंदिरात३५१ जोडप्यांसह महा अभिषेक संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) प्रचंड ऊर्जा,भक्ती आणि प्रसन्न वातावरणात ३५१ जोडप्यांनी सहभाग नोंदवला. सेलू : गेल्या वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त सेलू येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात दि. 26 फेब्रुवारी बुधवार रोजी साईबाबा मंदिरात महाभिषेकाची जय्यत तयारी पूर्ण करून देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील् जलाश्याने शहरातील 351 जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महा आरती बुधवारी सकाळी 10:30 वाजता सुरु करण्यात आला. अभिषेकासाठी लागणारे साहित्य सेलू नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष मा. विनोद हरिभाऊ काका बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळ आणि मंदिर समिती तर्फे देण्यात आले.अतिशय नयनरम्य सोहळा श्री साईबाबा मंदिर मध्ये पार पडला.या वेळी ३५१ यजमानांचा डोळ्यातील आनंद पाहण्यासारखा होता.विनोद बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळातर्फे महाशिवरात्रीला महाअभिषेकची संधी उपलब्ध करून दिली. अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व यजमानांनी महाभिषेकाचा लाभ घेतला. सर्व भक्तांना महाभिषेक संपन्न झाल्यावर महाआरती ने सांगता झाली. विनोद बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळानी महाभिषेकासाठी लागणारे सर्व साहित्य (चौरंग,टोपी,रुमाल, पिस ताट,तांब्या आदी साहित्य ) भाविकांना सस्नेह भेट देऊन अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वी केला. सेलूकरांना पूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात सायंकाळी 7:30 वाजता स्वरांगण प्रस्तुत "स्वरभक्ती संध्या" हा भक्ती गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यामध्ये स्थानिक कलाकारांनी अतिशय सुंदर अश्या आपल्या आवाजाने समोरच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हजारो भाविकांनी या भक्तिगीतांचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेलू तालूका बाजार समितीचे अध्यक्ष मा. मुकेश हरिभाऊ काका बोराडे,नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे व्यंकटबापू चव्हाण, सुभाष चव्हाण, राजेंद्र पवार, सुदाम घुटाळ व विनोद बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळ आणि साईबाबा मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0