४७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.२३:-येथील लोकमान्य विद्यालयाच्या ४७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा येथील गवराळा गणेश मंदिरात नुकताच पार पडला.संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी हा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. सुरुवातीला सर्वांनी मिळून गणेशाची आरती केली व प्रसाद वितरण केले. त्यानंतर टेकडी खालील हनुमान मंदिराच्या मागील सभागृहात सर्वांनी अल्पहार घेतला. अल्पहारानंतर सत्र सुरू झाले. सुरुवात सुचिता बेलगावकर यांच्या भक्ती गीत व भावगीतानी झाली. वातावरण भक्तीमय झाले त्यानंतर प्रास्ताविक विलास भास्करवार यांनी केले. सर्वांनी सविस्तर आपआपल्या परिवाराचा परिचय करुन दिला. ४७ वर्षानी सर्व भेटत होते. त्यामुळे किती सांगावे किती बोलाव वाटत होते. आनंदाचा संघर्षाचा अनुभव तसेच शालेय आठवणी सुद्धा सगळ्यांनी सांगितल्या. भरपूर उत्साह होता. त्यानंतर आमच्या काळातील ज्येष्ठ शिक्षक श्री चिडे सर व श्री पारधे सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे मनोगत पण झाले. शेवटी सौ. मिलमीले यांच्या गाण्याने सत्र संपले.त्यानंतर सर्वांनी सामूहिक भोजन केले. भोजन करता करताही गप्पा सुरु होत्या.भोजनांतर द्वितीय सत्र उषा झाडे यांच्या भजनाने सुरू झाले. स्नेह मिलना संबंधी काही चर्चा अनुभव व काही सूचना यांची देवाण-घेवाण झाली. सर्वांनी गाणे व भजन म्हटले. खूप आनंद झाला. सर्वांना खूप बोलावे असे वाटत होते. वेळेची मर्यादा लक्षात घेता सर्व आटोपते घेण्यात आले. शेवटी सौ. तांबोळी यांच्या पसायदान ने सत्र संपले.त्यानंतर सर्व मिळून नाग मंदिरात एकत्र आलो सर्वांनी मंदिरात दर्शन घेतलं. नंतर चहा बिस्कीट घेऊन आपापल्या स्थानी प्रस्थान झाले.स्नेह मिलन फारच छान झाले. सर्वांना खूप आनंद झाला पुन्हा पुन्हा असे मिलन व्हावं असं वाटत होतं. सर्व सत्तेचाळीस वर्षांनंतर मिळाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच जाणवत होता. जाताना सर्व भावुक झाले होते. पुन्हा कधी भेटू असे सर्वांना वाटत होते. असे हे स्नेह मिलन अविस्मरणीय आणि आनंदात संपन्न झाले.
byMEDIA POLICE TIME
-
0