महाकुंभमेळ्याच्या समाप्तीपूर्वी प्रयागराज मध्ये भाविकांची तोबा गर्दी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )प्रयाग राज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्या साठी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रयागराज शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येने ६० कोटींचा टप्पा ओलंडला आहे. कुंभमेळ्याला काही दिवस शिल्लक राहिले असल्याने महाशिवरात्रीच्या आधी मोठ्या प्रमाणावर भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार १३ जानेवारी रोजी सुरूवात झालेल्या कुंभमेळ्यात दररोज एक कोटींहून अधिक भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत. यामुळे प्रयागराज आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.प्रयागराज येथील वाहतूक कोंडीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्या मधून आलेल्या चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच वाहानांच्या पार्किंगची सोय करण्यासाठी अतिशय सुंदर नियोजन केले आहे. रेल्वे स्टेशन वर सर्व भाविकाची गर्दी होत असल्याने एकाच वेळी लोक गर्दी करू नये म्हणून अतिशय नियोजनबद्ध रेल्वे स्टेशन वर नियोजन केले आहे. भाविकांना त्यांच्या नियोजीत रेल्वे मध्ये ज्या मार्गाने जाणार आहे त्याच गावाचे यात्रेकरू जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय सुंदर नियोजन केले आहे. मुख्यमंत्री मा.योगीजीं आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा कठोर परिश्रम घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कुठेही गालबोट लागू नये याची पूर्ण काळजी घेत असल्याचे निदर्शनास येत होते.

महाकुंभमेळ्याच्या समाप्तीपूर्वी प्रयागराज मध्ये भाविकांची तोबा गर्दी.                                                   
Previous Post Next Post