समुद्रपूर येथील ब्रिलियंट CBSE स्कूल च्या कराटे पटूने जिल्हा कराटे स्पर्धेत मारली 21 मेडल ची भरारी... l
राजु कांबळे
मीडिया पोलीस टाईम
वर्धा नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी
समुद्रपूर. : वर्धा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शिव वैभव कॉलेज च्या इनडोअर स्टेडियम मध्ये जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत समुद्रपूर येथील ब्रिलियंट CBSE स्कूल च्या कराटे पटूंनी कराटे कुमिते आणि काताज मध्ये खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत 21 मेडल वर आपला ताबा मिळविला.
विद्या विकास शिक्षण संस्था (हिंगणघाट ) चे सचिव माननीया नयना ताई उमेश तुळसकर मॅडम ( हिंगणघाट नगराध्यक्षा ), मान .श्री. मेघश्याम ढाकरे सर (व्हॉईस प्रिन्सिपल, विद्या विकास महाविद्यालय)आणि स्कूल प्रिन्सिपल मान .श्री. अजय बुले सर यांनी सर्व विजयी मेडलिस्ट कराटे पटूंचे आणि विदर्भ चीप सिनियर कराटे प्रशिक्षक शिहान राजु एन.कांबळे, स्कूल च्या कराटे प्रशिक्षिका काजल डोंगरे यांचे अभिनंदन करीत सत्कार केला.
या जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत कराटे पटू अथर्व पानेकर ,(गोल्ड सिल्वर), कु.वांशिका पांगुळ (गोल्ड सिल्वर ), राज मुडे (गोल्ड ब्राँझ) रियांश कांबळे (सिल्वर ब्राँझ) चेतन भोगेकर( सिल्वर ब्राँझ), कु.दिव्यांनी धोटे (2 सिल्वर), कु प्रवृत्ती उसरे( 2 ब्राँझ), कु. गुंजन खुरसंगे (2 ब्राँझ), रुद्र तामगाडगे (ब्राँझ) चैतन्य भिसे (ब्राँझ ), कु. आरोही मरसकोल्हे( ब्राँझ) रितेश चव्हाण (ब्राँझ ) स्पंदन पाटील (ब्राँझ) या सर्व कराटे पटूंनी घवघवीत यश संपादन केले.
सर्व खेळाडू आपल्या विजयाचे श्रेय सेन्साई निलेश राऊत सर(चीप जज), शिहान मंगेश भोंगाडे सर(वर्धा कराटे डो स्पोर्ट असोसिएशन सचिव), प्रा. मान. श्री. प्रदीप कापकर सर (क्रीडा विभाग विद्या विकास महाविद्यालय), मुख्य कराटे प्रशिक्षक शिहान राजु एन कांबळे सर ( वर्धा कराटे डो स्पोर्ट असो. टेक्निकल डायरेक्टर), कराटे प्रशिक्षिका काजल डोंगरे , ब्रिलियंट चे सर्व शिक्षिका स्टाफ , कर्मचारी वृंदआणि आपल्या आई वडिलांना देते.

