तहसील कार्यालय अक्राणी येथे काम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कडून मा तहसिलदार अक्राणी यांना निवेदन. (उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी )अक्राणी: तहसील कार्यालय अक्राणी येथे काम करणारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कडून मा तहसिलदार अक्राणी ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनातील प्रमुख मागण्या ह्या आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी गेल्या ५ ते ६ महिन्या पासून जे काही महत्त्वाचे सोपवलेली काम पूर्ण करत आहोत व या पुढे ही याच प्रमाणे करु मा. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीच्या योजना आणि त्यांना दिलेल्या आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतीना आशा पल्लवीत केल्या आहेत.हया आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक व युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना तिथेच कायम स्वरुपी करू असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मा. कौशल्य विकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले होते त्यानुसार विविध शासकीय कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना या पुढे ही मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देण्यात यावे. या वेळी उपस्थित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अश्विन पोतदार,मगन वसावे, उदेसिंग पराडके, मनिष वळवी,चंदन पाडवी, सुनिल पावरा, हेमंत पावरा, शिवाजी राहसे, दौलत पावरा, अरुण पावरा, संदिप पावरा, स्वप्नील वळवी, सचिन पावरा, राजेंद्र साळवे, सविता पावरा ,रमिला पराडके, विजया पावरा, सोनाली पाडवी,
byMEDIA POLICE TIME
-
0