एरंडोलला रा. ति. काबरे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. . (कासोदा.. प्रतिनिधी).एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कलातरंग २०२४-२५ नुकतेच उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र काबरा होते.स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी राजेंद्र डी. महाजन, उद्योजक तथा बालाजी ऑईल मीलचे संचालक संजय काबरा उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चिटणीस श्रीकांत काबरा, सहचिटणीस सागर मानुधने, शालेय समिती चेअरमन राजीव मणियार, रा. हि. जाजू शालेय समिती चेअरमन जगदीश बिर्ला, स. न. झवर विद्यालय पाळधी शालेय समिती चेअरमन विजय झवर, संजय काबरे, प्रविण झवर, अनुपम जाजू, सुनिल मानुधने, पंकज काबरा, सिध्देश महाजन, यश मणियार, यश काबरे उपस्थित होते.यावेळी इ. ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, गायन, समाज प्रबोधनपर नाटीका आदी कार्यक्रम सादर केले. मान्यवरांचे स्वागत लेझीम पथकाने जल्लोषात केले. सकाळ सत्रात विविध क्रिडा कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संस्कृतिक सांस्कृतिक, क्रिडा कार्यक्रमाचे बक्षिस वितरण २५ जानेवारी रोजी झालेल्या सकाळ सत्रात करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक संजय काबरा, संस्थाध्यक्ष शरदचंद्र काबरे, चिटणीस श्रीकांत काबरे, सहचिटणीस सागर मानुधने, राजीव मणियार, जगदीश बिर्ला, प्रविण झवर, विजय झवर, यश मणियार, मुख्याध्यापिका कल्पना झवर, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके, पी. एस. नारखेडे पर्यवेक्षिका डी. एम. काबरा मॅडम यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन १० वीच्या विद्यार्थ्यांनी एस. एस. महाजन, ए. एस. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
byMEDIA POLICE TIME
-
0