विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा प्रभावी वापर व सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन. (रावेर प्रतिनिधी सानिया तडवी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि श्री विठ्ठल राव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभे अंतर्गत 'आत्मनिर्भर युवती अभियान' या सहा दिवसीय उपक्रमा अंतर्गत पहिल्या दिवशी पोलीस स्टेशन रावेर येथे क्षेत्रभेट देण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्याच्या स्वरूपा बद्दल माहिती दिली तसेच पीएसआय प्रिया वसावे यांनी विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा योग्य वापर स्नॅपचॅट, व्हाटट्सऐप तसेच फेसबुक वापरताना घ्यावयाची दक्षता याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच पोलीस स्टेशन मधील विविध विभाग व कार्यपद्धती याबद्दल माहिती विद्यार्थिनींना दिली. मुलींच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे व शंकेचे निरसन देखील करण्यात आले. पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी याप्रसंगी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा सत्यशील धनले, युवती सभाप्रमुख डॉ स्वाती राज कुंडल तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ नीता जाधव यांची उपस्थिती होती.

विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा प्रभावी वापर व सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन.                                                   
Previous Post Next Post