*शहादा ते प्रकाशा मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम लवकर करा-बिरसा फायटर्सची मागणी**२ वर्षांपासून काम संथ गतीने,पूल अपूर्णच!*. (शहादा प्रतिनिधी: ) शहादा ते प्रकाशा मुख्य रस्त्यावरील डामरखेडा येथील पुलाचे काम तातडीने पूर्ण करा,या पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे.ते लवकर पूर्ण करा व पुलाजवळील खड्डेमय रस्ता दुरूस्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा ते प्रकाशा या मुख्य रस्त्यावरील डामरखेडा येथील पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे.गेल्या २ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे.ते अद्याप पूर्ण झालेले नाही.त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून शहादा ते प्रकाशा मार्गावर बस,माल ट्रक इत्यादी जड वाहने बंद करण्यात आलेली आहेत. बस पर्यायी मार्गाने शहादा हून प्रकाशा जाते.अंतर वाढल्यामुळे बसचा भाडाही प्रवाशांकडून अधिक आकारला जातो. शहादा ते प्रकाशा मुख्य रस्ता जड वाहनांसाठी बंद असल्यामुळे व या मार्गावरील डामरखेडाच्या पुलाजवळील रस्ता पूर्ण पणे उघडल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनधारकांना खूपच त्रास होत आहे. म्हणून शहादा ते प्रकाशा मुख्य रस्त्यावरील डामरखेडा येथील पूल तातडीने दुरूस्त करण्यात यावा,तसेच पूलाजवळील रस्ताही दुरूस्त करण्यात यावा.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

*शहादा ते प्रकाशा मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम लवकर करा-बिरसा फायटर्सची मागणी**२ वर्षांपासून काम संथ गतीने,पूल अपूर्णच!*.                  
Previous Post Next Post