अखेर सेलू मुख्याधिकार्यांद्वारे हमीपत्र सादर. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).पाणी पुरवठा सुरळीत होणार : 31 मार्च पर्यंत मुदत.सेलू : दि.15लोअर दुधना सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना 31 मार्च 2025 पर्यंत टप्प्या टप्प्याने 15 लाख रुपये थकबाकी रक्कम भरावयाचे हमीपत्र सेलू नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दिले आहे.सेलू नगरपालिके कडील पाणी पुरवठ्याबद्दलची रक्कम थकल्याबद्दल लोअर दुधना प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सेलू शहराचा पाणी पुरवठा खंडीत केला. त्यामुळे सेलू वासीयांना कृत्रीम पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. सणा सुदीच्या काळात पाणी पुरवठा खंडीत होवू लागल्याने नागरिक संतापले. दरम्यान, नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी कार्यकारी अभियंत्यांना 31 मार्च पर्यंत टप्प्या टप्प्याने 15 लाख रुपयांची थकबाकी भरावयाचे हमीपत्र दिले. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश बजावला आहे. त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी 6 वाजता सेलू शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान, 31 मार्च पर्यंत हमीपत्र देवूनसुध्दा 15 लाख रुपयांची थकबाकी अदा न केल्यास पुन्हा पाणी पुरवठा खंडीत होवू शकतो, असे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

