चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू तस्करांना केले जेरबंद...-- भद्रावती पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई..महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि.4:-भद्रावती तालुकातंर्गत रेती घाटांचे लिलाव झाले नसतांना मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचे उत्खनन करणारे सम्राट सक्रिय आहेत.मात्र,चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू चोरट्यांना गुपनिय माहितीच्या आधारे जेरबंद केले.रेती चोरी प्रकरणातंर्गत तरुण युवक जास्त प्रमाणात असल्याचे कारवाई दरम्यान लक्षात आले आहे.सध्यास्थित कामधंदा म्हणजे रेतीचोरी असे समीकरण झाले असून गावातील लोकांची झोप उडवून रेती चोरी करण्याचा प्रकार भद्रावती तालुक्यात सर्रास सुरू आहे.रेती चोरीवर आळा बसण्याकरीता सबंधित प्रशासनाला प्रसार माध्यमातून माहीत देण्यात आली "पण" कारवाई कशाची?या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना गोपनिय माहीती मिळाल्यावरून येथील कर्तव्य दक्ष पथकांनी भद्रावती हद्दीतील मौजा चारगांव परिसरातून अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असल्याचा मिळालेल्या माहीतीनुसार सापळा रचला असता चोरटे सापळ्यात अडकले.त्यांचा कडून रेती भरलेले ट्रॅक्टरसह एक ब्रास रेती जप्त केली.सापळ्यात सापडलले आरोपी १) अमोल पोटे ट्रॅक्टर मालक (वय ३२ वर्ष रा. भद्रावती), २) गणेश संतोष ठाकरे (वय २७ वर्ष रा. चारगांव तह. भद्रावती) यांचे विरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत अप. ५५/२०२५ कलम ३०३ (२) भा. वा. सं. सहकलम १७७ मो. व. अ. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची पोलिसांनी माहीत दिली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू,यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांचा नेतृत्वात साहय्यक पोलिस निरीक्षक बलराम झाडे,पोलिस उपनिरिक्षक संतोष निंभोरकर,नापोअ संतोष येलपुलवार,नितीन रायपूरे, मिलिंद जांभळे,गणेश भोयर, प्रमोद कोटनाके यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

