पैसे नाही तर हरभरे तरी दे! चण्याच्या बदल्यात पैसे मागणाऱ्या ‘भुक्कड’ भूकरमापकाला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे ). लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तालुक्यातील निंभोरा येथे घडलेल्या या घटनेत, आरोपीने शेतजमिनीच्या मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी लाच मागितली होती. विशेष म्हणजे, पैशांऐवजी हरभऱ्याची मागणी करणाऱ्या या भूकरमापकाला अखेर ACB च्या जाळ्यात अडकावे लागले.मस्कावद (ता. रावेर) येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याची आणि त्यांच्या काकांची संयुक्त शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजमापासाठी त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) यांनी मोजमाप केले. पण खुणा दाखवण्याच्या बहाण्याने त्यांनी ५,५०० रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, कुलकर्णी म्हणाले, “पैसे नाहीत तर हरभरे तरी दे!” शेतकऱ्याला हे पटले नाही, आणि त्याने थेट ACB कडे धाव घेतली.तक्रारीनंतर ACB ने पडताळणी सुरू केली. यात कुलकर्णी यांनी लाचेची रक्कम हळूहळू कमी करत ५,५०० वरून ५,००० आणि शेवटी ४,००० रुपयांवर तडजोड केली. ACB ने याची खात्री करून सापळा रचला. २६ मार्च रोजी निंभोरा येथील एका शेताजवळ शेतकऱ्याने कुलकर्णीला ४,००० रुपये दिले, आणि पैसे हातात पडताच ACB पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांनी मोलाची साथ दिली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाने हे ऑपरेशन पार पडले. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे.हरभऱ्यापासून पैशांपर्यंतचा प्रवासया घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लाचेसाठी हरभऱ्याची मागणी करणारा हा भूकरमापक शेवटी पैशांवर समाधान मानला, पण ACB च्या सजगतेमुळे त्याचा डाव उधळला गेला.

पैसे नाही तर हरभरे तरी दे! चण्याच्या बदल्यात पैसे मागणाऱ्या ‘भुक्कड’ भूकरमापकाला  चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई                                           
Previous Post Next Post