*ऐनपुर येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला* (ऐनपूर ता रावेर प्रतिनिधी (सलमान खान) ऐनपूर येथे 2025 /2026 हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 18 रोजी उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ शामू पाटील हे होते. उपस्थित मान्यवरांचे दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन केले. यावेळी मंचावर काशिनाथ शामू पाटील , ऐनपुर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे, अमोल महाजन, हैदर अली ,सलमान मुस्तफा खान, एस एस पाटील सर ,रामदास सर ,विकास उर्फ मिलिंद अवसरमल , पवन पाटील ,विलास अवसरमल, तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते कुसुंबा केंद्राचे केंद्र समन्वयक भूषण चौधरी ,माजी केंद्रप्रमुख विलास कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सदर स्नेह संमेलनात चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्यासह कार्यक्रम सादर करून मान्यवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .चिमुकल्यांचे गाण्यावरील सादरीकरण लक्षणीय ठरले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे मान्यवर तसेच ग्रामस्थांनी बक्षीस देत त्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम गट विकास अधिकारी विनोद मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले .सूत्रसंचालन घोलाने सर तर आभार प्रतिभा पाटील मॅडम यांनी मांडले.

ऐनपुर येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला*           
Previous Post Next Post