हेल्पिंग हँड्स NGO भद्रावती तर्फे भव्य शिवजयंतीच्या रॅलीला शरबत वाटप.. ( महेश निमसटकर जिल्हा विभागीय संपादक भद्रावती ) भद्रावती : 19 फेब्रुवारी 2026 रोजी भद्रावती शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे हेल्पिंग हँड्स NGO चे नेहमीच प्रेरणास्रोत राहिलेले आहेत. त्यांच्या या शिवजन्मोत्सवानिमित्त कृतज्ञता भाव म्हणून भद्रावती शहरामध्ये भद्रनाथ युथ फाउंडेशन भद्रावती तर्फे निघालेल्या भव्य विराट शिवप्रेमींच्या रॅलीमध्ये शहरातील स्थानिक NGO "हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पस सोसायटी, भद्रावती" तर्फे रतन ज्यूस सेंटर सामोर भद्रावती येथे भव्य शरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स NGO तर्फे नेहमी सहकार्य करणारे कृतांत सहारे, राजरतन पेटकर, प्रशांत सातपुते, प्रणय कांबळे, रीता सहारे, स्नेहा सातपुते, छकुली पेटकर, स्वप्निल बनकर, वैभव रामटेके, संकेत चिमूरकर, कारण सोंडवले, अनिकेत बांबोडे, डॉ अमित नगराळे, मिलिंद वाघमारे, दिलीप वानखेडे, सोनल पाटील, संदीप चटपकर, रोशन पेटकर, प्रेम सपकाळ, विकास भेले, आकाश मानकर, साजन ढेंगळे, अनिकेत उपरे, सोनू सिंग, सुकेशनी मानकर, किरण कवाडे, लीना उराडे, सुकेशिनी रामटेके, प्राची वेल्हेकर, तुषार दुर्गे, राणी पाल, भाग्यश्री थुलकर, कोमल शिंगाडे, भूषण रामटेके, सागर निरंजने, दक्षिणा हुमणे, राहुल रोडगे, आणि इतर सर्व हेल्पिंग हँड्स NGO मित्र परिवार आणि शुभचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0