पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. व सपोनि दिपक वानखडे सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात दि. 16/01/2026 रोजी नाईट गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा पंकज काळे याचे घरी नुकताच देशी व विदेशी दारूचा माल आला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. यांना देवून त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सदर इसमांचे राहते घरांची पंचासमक्ष कायदेशीर रित्या झडती घेतली असता घरझडतीत 1) 7 खर्डयाचे खोक्यात विके कंपनीच्या देशी दारूची 90 मिलीच्या 700 सिलबंद शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 84,000 रू 2) 10 खर्डयाचे खोक्यात टँगो पंच देशी दारू कंपनीच्या 90 मिलीच्या 1000 सिलबंद शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 1,20,000 रू 3) 31 खर्डयाचे खोक्यात कोकण देशी दारू कंपनीच्या 90 मिलीच्या खर्डयाचे 3100 सिलबंद शिश्या ज्यामध्ये 5 पेटयाचा प्रती शिशी 120 रू प्रमाने 3,72,000 रू 4) 27 खर्डयाचे खोक्यात भिंगरी देशी दारू कंपनीच्या 90 मिलीच्या 2700 सिलबंद शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 3,24,000 रू 5) 5 खर्डयाचे खोक्यात राँयल स्टँग कंपनीच्या 2 लिटरचे विदेशी दारूचे 30 सिलबंद बंपर प्रती नग 3500 रू प्रमाने 1,05,000 रू 6) 8 खर्डयाचे खोक्यात राँयल स्टँग कंपनीच्या 180 मिलीच्या विदेशी दारूच्या सिलबंद 384 शिश्या प्रती शिशी 350 रू प्रमाने 1,34,400 रू 7) 2 खर्डयाचे खोक्यात राँयल स्टँग बँरेल सिलेक्ट कंपनीच्या 180 मिलीच्या सिलबंद 48 शिश्या प्रती शिशी 350 रू प्रमाने 33,600 रू 8) 2 खर्डयाचे खोक्यात ओल्डमन कंपनीच्या 180 मिलीच्या सिलबंद 48 शिश्या प्रती शिशी 350 रू प्रमाने 33,600 रू असा जू.किं. 12,06,600 रू चा माल अवैदयरित्या साठा मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक सा. व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. व सपोनि दिपक वानखडे सा.. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथक पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहवा किशोर कडू, पोहवा जगदीश चव्हाण, पोहवा सुनिल मेंढे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0