*संताई* बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी (.*मानवत / प्रतिनिधी.)———————————मानवत येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती साजरी करण्यात आली. मानवत शहरात गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य व धार्मिक कार्य करत असलेल्या *संताई* बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात येत आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि प्रतिमा पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्याला व त्यागाला डोळ्यासमोर ठेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संताई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जया संतोष भदर्गे सचिव हरिभाऊ काकडे कोषाध्यक्ष मनीषा कांबळे व बालासाहेब खोपे मिलिंद जोंधळे शिवनंदा ढगे आशा झोडपे आदीसह शेकडो बहूजन समाज बांधव व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या **

संताई* बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी                    
Previous Post Next Post